बिरसी येथे माविम तर्फे व्हीलचेअर वाटप

0
59

♦️ निराधार व्यक्तींना आधार देण्यासाठी माविम अग्रेसर – आशा दखने 

न्यूजप्रभात वृत्तसेवा

आमगाव : येथील महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्वावलंबन लोक संचालित साधन केंद्राच्या वतीने दि. 10 जानेवारी रोजी बिरसी येथिल रहवासी सुधीर रहांगडाले यांना व्हीलचेयर देवून सत्कार करण्यात आला.
प्रेरणा ग्राम संस्था बिरसी येथे सावित्री बाई फुले जयंतीचे औचित्य साधून या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
या प्रसंगी माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वयक संजय संगेकर, स्वावलंबन लोक संचालित साधन केंद्राच्या सचिव तृप्ती बहेकार ,व्यवस्थापक आशा दखने,सहयोगिनी पुस्तकला खैरे, संध्या पटले, व बिरसी गावातील मान्यवर उपस्थित होते.
माविम च्या स्वावलंबन लोक संचालित साधन केंद्राच्या वतीने महिला आर्थिक विकास आणि समाज सेवेचे व्रत हाती घेऊन निरारांना आधार देण्यासाठी कठीबंध आहे असे मत आशा दखने यांनी व्यक्त केले.
सदर मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग सुधीर रहांगडाले याना व्हिलचेयर भेट देण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन खैरे तर आभार बहेकार यांनी मानले.

Previous articleआश्रम शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन १३,१४ जानेवारी रोजी
Next articleआदर्श विद्यालयात राष्ट्रीय युवा दिवस साजरा