आदर्श विद्यालयात राष्ट्रीय युवा दिवस साजरा

0
51
1

गोंदिया / धनराज भगत

आदर्श कनिष्ठ महाविद्यालय आमगाव येथे स्वामी विवेकानंद जयंती प्रसंगी राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक  यू एस मेंढे व उपस्थित सकाळ पाळीतील शिक्षकांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाबाई यांच्या प्रतीमेस माल्यार्पण करण्यात आले.


राष्ट्रीय युवा दिवस निमित्त निवडणूक आयोगाच्या सुचने नुसार कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मतदार जागृती प्रभात फेरी नगरातून फिरविण्यात आली व मतदानासाठी जन जागरण करण्यात आले. या प्रसंगी आमगाव तहसील कार्यालयातील तहसीलदार  भुजाडे साहेब उपस्थित होते.
या प्रभात फेरीचा समारोप आदर्श विद्यालयात झाला. या प्रसंगी भावी मतदार समोर मतदानाचे महत्त्व व मतदार जागृती या विषयावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. श्री भुजाडे साहेब यांनी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.