आपला विदर्भगोंदिया

नविन प्राथमिक शाळा, पांढराबोडी शाळेचे सुयश

गोंदिया / धनराज भगत

गोंदिया भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय, गोंदिया शिक्षण विभाग प्राथमिक, माध्यमिक व जि. परिषद हायस्कूल, वडेगाव/सातोना यांच्या संयुक्त विद्यमाने 6 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान दि. 2024 पर्यंत स्काऊट गाईड जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या जिल्हा मेळाव्यात नविन प्राथमिक शाळेतील 10 स्काऊट व 10 गाईड सहभागी झाले होते या जिल्हा मेळाव्यादरम्यान अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

ज्यामध्ये शोभायात्रा, तंबू निरीक्षण, बिनभांड्याचा स्वयंपाक, लोकनृत्य, पथसंचलन, साहसी खेळ, सांस्कृतिक स्पर्धा, हस्तकला, ​​रांगोळी इ. या स्पर्धांमध्ये शाळेच्या स्काऊट आणि गाईड्सनी सहभाग दर्शविला. शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी वारकरी दिंडी चे प्रदर्शन सादर केले. लोकनृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविला. जिल्हा मेळाव्याला उपस्थित असलेले गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्काऊट गाईडचे चारित्र्य घडविण्यात नेहमीच योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.स्काऊट गाईड हे नेहमीच प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याचे धाडस असणारे असतात, तसेच सदैव तत्पर असतात.

यामध्ये सहभागी स्काऊट- यश डहारे (संघनायक),अनंत बावनकर,मोहित आंबेडारे,यशकुमार लिल्हारे, सिद्धू नागपुरे(उपसंघनायक), सर्व डहारे,आर्यन आंबेडारे,क्रिष्णा दमाहे,अर्जुन चिखलोंढे, हर्ष मानकर आणि गाईड – आरुषी चिखलोंढे(संघनायिका), आरुषी लिल्हारे(उपसंघनायिका), स्वीटी नागपुरे, वैशाली दमाहे, गौरी नागपुरे, कीर्तिका ढोमने, प्रगती गरेटे, विद्या डहारे,खुशी दमाहे, पल्लवी मानकर यांनी सहभाग घेतला.

स्काऊट शिक्षक  मनीषकुमार आर. मेश्राम आणि गाईड कॅप्टन श्रीमती प्रणिता अनमोल बडोले व सहकारी शिक्षिका कु.डी.पी.नागपुरे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक आर.के.बडोले सर यांनी विद्यार्थ्यांचे यशाबद्दल अभिनंदन केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

नविन प्रा.शाळेचे सचिव मा एन.वाय.बडोले सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!