ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका

0
47

गोंदिया / धनराज भगत

आमगाव -स्थानिक भवभुती शिक्षण संस्था द्वारा संचालित श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे आज स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने नॅशनल युथ दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डि.के. संघी व राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. तुलसीदास निंबेकर उपस्थित होते. याप्रसंगी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला मालाअर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तुत्ववान, ह्या शब्दातून डॉ. डी के संघी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांतून श्रीदय भांडेकर, रितिक जैतवार, खुशी मुनेश्वर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. महाविद्यालयाचे प्राध्यापक देवेंद्र बोरकर, रोशनी अग्रवाल, ऋतू कोरे, मनीषा बिसेन,परमेश्वर वानखेडे आदी उपस्थित होते.