दिनांक :- 13जानेवारी 2024
वर्धा जिल्हा प्रतिनिधी : -गजानन पोटदुखे
देवळी शहरात मनोहर मंदिर देवस्थान येथे स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली . यावेळी स्वामी विवेकानंदाच्या जीवन चरित्रावर भाष्य करण्यात आले . त्यांनी युवा वर्गासाठी मोलाचे कार्य केले त्यावर सुद्धा भाष्य करण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थी सुजन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडूभाऊ जोशी, प्रमुख अतिथी सुनीलजी गावंडे ( प्राचार्य नवभारत अध्यापक विद्यालय वर्धा ), प्रमुख वक्ता सुमितजी उरकुडकर, प्रमुख उपस्थिती प्राध्यापक डॉ. दामोदर लांबट, वसंत तरास, मंगेश पिंपळकर, प्रकाश भाऊ चांभारे ( अखिल भारतीय ग्राहक पंचायत ) आणि समस्त आयोजक आणि समस्त भारतीय ग्राहक पंचायत, देवळी आणि देवळी शहरातील मान्यवराच्या उपस्थित कार्यक्रम आयोजित करण्यात आला.