आपला विदर्भगोंदिया

जिल्हा परिषद हायस्कूल दवनीवाडा स्काऊट चे सुयश

गोंदिया / धनराज भगत

गोंदिया भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय, गोंदिया विभाग माध्यमिक, प्राथमिक व जिल्हा परिषद हायस्कूल वडेगाव/ सतोणा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 ते 9 जानेवारी 2024 दरम्यान गोंदिया भारत स्काऊट गाईड जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात जिल्हा परिषद हायस्कूल येथील 10 स्काऊट विद्यार्थी सहभागी झाले होते या जिल्हा मेळावामध्ये अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.

ज्यामध्ये शोभायात्रा, तंबू निरीक्षण, बिन भांड्याच्या स्वयंपाक, हस्तकला, रांगोळी स्पर्धा, सांकृतिक कार्यक्रम, इत्यादी स्पर्धा मध्ये विद्यार्थ्यांनी अनेक बक्षीस पटकवाले. जिल्हा मेळाव्यात उपस्थित असलेले गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्काऊट गाईड चे चरित्र नेहमीच घडविण्यात योगदान आहे.

या मध्ये सहभागी स्काऊट समर चौरे , शुभांशू पटले ( उपसंघनायक) , उज्ज्वल शेंडे , कीर्ती आसोले, पियूष रहांगडाले, आर्यन गजभिये ( संघनायक), सुकेश बिसेन, नूतन पंदेले, जतिन डोंगरे यांनी यात सहभाग घेतला,
या संघाचे प्रशिक्षक श्री अंकुश वैद्य यांनी केले.

या सर्वांचे यशाबद्दल हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री रीनायत सर यांनी कौतुक करून अभिनंदन केले, त्याच प्रमाणे शाळेतील शिक्षक श्री एच. एस. बीसेन सर , श्री झोडे सर, श्री बोरकर सर , वैशाली पुरी मॅडम, आर. टी. बिसेन सर , श्री पटले सर, बागडे सर, श्री गजभिये सर , हरिणखेडे मॅडम, भगत मॅडम , रहागडले मॅडम या सर्वांनी खूप कौतुक करून अभिनंदन केले व मनःपूर्वक शुभेच्छा दिले.

error: Content is protected !!