आमगांव येथील बसंत नगरातील हनुमान मंदिरात “साहित्य में श्रीराम” या विषयावर एका विचार गोष्ठीचे आयोजन साजरा

0
27
1

गोंदिया / धनराज भगत

अखिल भारतीय साहित्य परिषद, नवी दिल्लीच्या विदर्भ प्रांत शाखेअंतर्गत जिल्हा शाखा गोंदिया आणि ज्येष्ठ नागरिक संघ आमगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आमगांव येथील बसंत नगरातील हनुमान मंदिरात दि.12.01.2024 ला “साहित्य में श्रीराम” या विषयावर एका विचार गोष्ठीचे आयोजन करण्यात आले होते. 
     याप्रसंगी अखिल भारतीय साहित्य परिषदेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष ॲड.लखनसिंह कटरे यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचे प्रयोजन सांगून जगात आढळून येणाऱ्या तीनशेहून अधिक रामायणातील रामासोबतच झाडीपट्टीतील लोकरामायणातील शेतकरी राम व शेतकरी सीता सुद्धा संक्षेपात समजावून सांगितली.
      या गोष्ठीचे प्रमुख विमर्शक पं.दीपक कृष्णशास्त्री हे होते. त्यांनी आपले विचार मांडताना तुलसीदास व वाल्मिकी यांच्या रामायणातील राम आणि हिंदू परंपरेप्रमाणे युगानुयुगे पुजिला जात असलेला राम यातील आंतर्संबंध कसा ते सोदाहरण स्पष्ट केले. एकूणच भारतीय संस्कृतीत व पर्यायाने भारतीय साहित्यात रामाचे अनन्यसाधारण असे महत्वपूर्ण स्थान त्यांनी आपल्या विवेचनात अधोरेखित केले. या विचार गोष्ठीचे दुसरे विमर्शक श्री.नरेंद्र शुक्ला यांनी साहित्यिकांच्या दृष्टिकोनातून रामाचे व्यक्तित्व, प्रभुत्व व तद्जनित रामाचा लोकमानसावरील प्रभाव याचे सुंदर विवेचन सादर केले. त्यांनी आपल्या विवेचनात विविध संस्कृत व हिंदी श्लोक सादर करून श्रोत्यांना कानतृप्त केले. श्री पुरुषोत्तमसिंह सोमवंशी यांनी रामावरील स्वरचित कविता सादर केली तर श्री तुकाराम चावके यांनी गीतरामायणातील ‘कुश-लव रामायण गाती’ हे गीत गाऊन सादर केले.
या प्रसंगी हनुमान मंदिराचे विश्वस्त श्री सुभाष आकरे, डाॅ.अनिल मुंजे, डाॅ.रमेश सोनी, पी.एच.पटले, नरेंद्र बाजपेयी, ज्येष्ठ नागरिक संघाचे रमेश रिन्हाईत, संतोष कटकवार, प्रकाश ढवळे, लक्ष्मण चुटे, भजनदास बोरकर, नरेंद्र वाजपेयी, नीताराम अंबुले, मनोहर सिंगनजुडे, अनिल आईन्द्रेवार, टिकाराम बळमे, दत्तात्रय लोखंडे, वसंत मिश्रा, एन.एस.कोसरकर यांच्यासह उपस्थित सर्व श्रोत्यांनी या विचार गोष्ठीचा लाभ घेतला.