आपला विदर्भताज्या घडामोडीनागपूर

भारतीय रियल स्टेट सल्लागार वेल्फेअर असोसिएशन युनियन ची स्थापना

न्यूजप्रभात वृत्तसेवा

राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, व भारतीय यूवा दिवस यांची प्रेरणा घेत भारतीय रियल इस्टेट सलाहकार वेल्फेअर असोसिएशन/युनियन, नागपूर ची स्थापना करण्यात आली. अत्यंत महत्वपूर्ण अशी नविन घटना आज नागपूरच्या ईतिहासात घडत आहे. महाराष्ट्र शासनाचा महारेरा कायदा जो ग्राहक हित, बिल्डर व डेव्हलपर आणि रियल इस्टेट सलाहकार या तिघांच्याही हिताचे रक्षण करण्यासाठी प्रस्थापित करण्यात आला आहे.

एवढे असूनही ब-याच गोष्टी ज्या ग्राहक व बिल्डर्सच्या हितात तर होत आहेत पण अजूनही जो महत्वाचा दूवा असणारे रियल इस्टेट सलाहकार त्यांच्या हितात होत नाहिए त्याकरिता त्यांच्या हितात कायदे समजावून सांगणे, प्रशिक्षण देणे, वेळोवेळी कायद्याची अंमलबजावणी झाली असली तरी त्यावर अंकुश ठेवणे आणि ग्राहक किंवा बिल्डर व डेव्हलपर द्वारे होणारी फसवणूक टाळणे व सलाहकारांच्या वेल्फेअरसाठी या असोसिएशनचे गठन करुन नवनिर्वाचित कार्य समितीचे गठन व नविन कार्यालयाचे ऊद्घाटन श्री. मयंक सराफजी चार्टर्ड अकांऊटट यांचे हस्ते पार पडले. संस्थापित अध्यक्ष श्री. राजविरसिंह यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या युनियनचे विधिवत ऊद्घाटन, पंजिकरण व कार्यनियोजन या पवित्र दिवसाने सुरुवात केली. युनियन द्वारे अपिल करण्यात येते की, नागपूर क्षेत्र व ईतर सर्व रियल इस्टेट सलाहकार जे या क्षेत्रात काम करतात त्या सर्वांनी या युनियन मध्ये आपले पंजिकरण करुन युनियनचे हात बळकट करावे असे आवाहन करण्यात आले.

error: Content is protected !!