ठाणा / सरोज कावळे
अयोध्येत 22 तारखेला होणाऱ्या श्रीराम मूर्ति प्राणप्रतिष्ठा सोहळयाला अनुसरुन आज दिनाक 13/01/2024 ला सामाजिक क्ष्रेत्रात काम करणाऱ्या (अनुलोम ) अनुगामी लोकराज्य महाअभियान या संस्थेचे पालक मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट शासन मा. देवेंद्रजी फड़वनिस यांच्या माध्यमाने कोदंडधारी प्रभु श्रीरामजीची मूर्ति ठाणा निवासी वस्तीमित्र श्री. सुरशाम मगरू कटरे यांना अनुलोम उपविभाग जनसेवक श्री. अशोक शेंडे व भाग जनसेवक मनीष शर्मा यांच्या उपस्थितीत त्याच प्रमाणे मा. देवेंद्रजी फड़वनिस यांनी वस्तीमित्राला लिहलेले पत्र अयोध्येत कारसेवकाला गेलेले श्री. गुणवतजी वट्टी जिल्हा प. सभापती व श्री. शोभेलालजी कटरे ( माजी जी. प. सभापती च्या हस्ते देऊन त्याचे वाचन करण्यात आले.आणि मान्यवराच्या हस्ते श्रीराम मूर्ति व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.सामाजिक कार्य करण्यासाठी व समाजाला सुरक्षरित ठेवन्यासाठी तयार राहन्यासाठी या पत्राच्या माध्यमातून सांगितले. यावेळी ठाणा गावातून भजन कीर्तन करून रैली काढण्यात आली. यात सर्व गावातील 100 ते 120 महिला पुरुष व तरुण, तरूणिचा सहभाग होता.

