गोंदिया / धनराज भगत
गोंदियाच्या गोरेगाव येथील तहसील कार्यालयाच्या पुढे जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेने हिट अँड रन या कायद्याच्या विरोधात स्टेरिंग छोडो आंदोलन व बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. सत्तेत असलेले भाजपचे खासदार सुनील मेंढे, माजी मंत्री परिणय फुके, भाजपचे आमदार विजय रहांगडाले हे काल उपोषण मंडपाच्या समोरून गेले. मात्र त्यांनी वाहन चालकांच्या उपोषणाकडे पाठ फिरवली व भेट दिली नाही यावरून वाहक चालकांमध्ये चांगलाच रोष पाहायला मिळाला असून त्यांनी भाजप नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत मुर्दाबाद चे नारे लावले.