“खेलो नागपूर खेलो” मध्ये चमकली फार्मसी महाविद्यालयाची विद्यार्थिनी

0
88

गोंदिया / धनराज भगत

नुकतेच सुरू असलेल्या विदर्भस्तरीय खासदार क्रीडा महोत्सव खेलो नागपूर खेलो यामध्ये श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आमगाव येथील द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कु. अनुष्का बोदेले हिने अथलेटिक्स मध्ये तृतीय पारितोषिक पटकाविले आहे.


12 जानेवारीला भारताचे खेळ मंत्री अनुराग ठाकूर यांनी नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केले होते. केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या परिश्रमातून 12 जाने. ते 23 जाने. च्या दरम्यान खेल महोत्सवाची सुरुवात झाली होती. सदर महोत्सवात सहभागी होण्यासाठी अनुष्काने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.के. संघी, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. तुलसीदास निंबेकर तसेच संस्थापक मा. केशवराव जी मानकर यांचे अभिवादन केले.