आपला विदर्भगडचिरोली

हायवा ट्रकच्या अपघातात पादचारीचा चेंदामेंदा.

प्रतिनिधी – अभिजित कोलपाकवार

आष्टी:-

चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील शितल रेष्टारंट च्या पुढे एका हायवा ट्रकच्या अपघातात ईसमाचा चेंदामेंदा झाला. मृतकाचे नाव कालीपद राजेन्द्र विश्वास वय ९० रा. आष्टी असे असून हायवा ट्रक क्रमांक एम एच ३३ टी ७४७४ असे आहे सविस्तर असे की, हायवा ट्रक हा शितल रेष्टारंट च्या पुढे उभा ठेवण्यात आला होता. ट्रक चालक नितीन सुधाकर कन्नाके वय ३० रा. मार्कंडा (कं) याने आपल्या ताब्यात असलेला ट्रक घेऊन आंबेडकर चौकाकडे जाण्यासाठी निघाला मात्र मृतक म्हातारा मागील चाकात आल्याने त्याचा चेंदामेंदा झाला

 

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक कुंदन गावडे व सहकारी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. ट्रक व चालक यास ताब्यात घेतले आहे

अधिक तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे व पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!