महायुती च्या सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची समन्वय बैठक संपन्न

0
84
गोंदिया / धनराज भगत

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती च्या सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची समन्वय बैठक दि.१४ जानेवारी २०२४ रोजी ग्रिनलैंड लॉन, बालाघाट रोड, गोंदिया येथे संपन्न झाली. महायुतीच्या भव्य संयुक्त सभेला सर्व घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. भारताचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय श्री नरेन्द्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आगामी लोकसभा निवणुकीमध्ये ४०० पार च्या दृष्टिकोनातून सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समन्वय साधुन काम करावे. खा. प्रफुल पटेलजी यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबुतीने काम करेल असे प्रतिपादन माजी आमदार  राजेन्द्र जैन यांनी केले. या महायुतीच्या संयुक्त सभेला असंख्य कार्यकर्ता उपस्थित होते.