अतुल पटले /तुमसर ;- सौ.शुभांगी सुनिल मेंढे यांच्या प्रेरणेने व डॉ बाबुराव मेंढे फाउंडेशन भंडाराच्या वतीने तुमसर तालुक्यातील “आंबागड” किल्ल्याचे संवर्धन व स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य, राजकारण निपुणता, गडकिल्ल्यांचे बांधकाम व स्थापत्य याचा अभ्यास करण्यासाठी खासदार श्री. सुनील मेंढे यांच्या पुढाकाराने व बाबुराव मेंढे प्रतिष्ठानच्या सौजन्याने भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील १०० तरुण मावळे, मागील दोन वर्षात महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा अभ्यास, दर्शन व महाराजांच्या जीवनापासून प्रेरणा घेण्यासाठी दौरा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रातील गडकिल्ले जतन व संवर्धन करण्याचा एक भाग म्हणून भंडारा जिल्ह्यातील व तुमसर तालुक्यातील गोंड राज्याचे वैभव असलेल्या “अंबागड” किल्ल्याचे स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. यावेळी तरुणांनी मोठ्या संख्येने या दैवी कार्यात खारीचा वाटा उचलावा असे आवाहन सौ.शुभांगी सुनील मेंढे यांच्याकडून करण्यात आले आहे.