लाखनी येथे संविधान संस्कृती विचार संमेलानाचे भव्य आयोजन

0
62

लाखनी – भारतीय संविधान हा आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे. या राष्ट्रीय ग्रंथामुळेच प्रत्येकाला मुलभूत हक्क व अधिकार मिळाले आहेत. अशा या भारतीय संविधानाचे महत्व संपूर्ण भारतीय समाजाला कळावे या उदात्त हेतूने

संविधान बचाव संघर्ष समीती तालुका लाखनी , महाप्रज्ञा बुद्ध विहार समीती मुरमाडी व ओबीसी सेवा संघ , लाखनी यांच्या संयुक्त विदयमाने दि. २१ जानेवारी २०२३ रोजी लाखनी येथील स्वप्नदिप सांस्कृतिक सभागृहात संविधान संस्कृती विचार संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

सदर संमेलन हे एकदिवसीय असून तीन सत्रात घेतले जाणार आहे. पहील्या सत्राचे उद्घाटन हे सकाळी १०ः ३० वाजता डॉ. सुशांतकुमार , नागपूर यांच्या हस्ते होईल. माजी सनदी अधिकारी ई.झेड खोब्रागडे हे पहिल्या सत्राचे संमेलनाध्यक्ष असून इजि. विकासदादा पटले हे स्वागताध्यक्ष आहेत. बहुजन चळवळीतील तडफदार युवा नेतृत्व प्रा. डॉ.लक्ष्मण यादव हे पहिल्या सत्राचे विशेष वक्ते आहेत. प्रा.डॉ. सर्जनादित्य मनोहर हे प्रमुख मार्गदर्शक असून रोशन जांभुळकर हे विशेष अतिथी आहेत. पहील्या सत्राचे प्रास्ताविक भाषण हे नरेश इलमकर सादर करणार आहेत तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.सुरेश खोब्रागडे करतील. सुरेंद्र बन्सोड यांची विशेष भुमिका असून आभार प्रा. उमेश सिंगनजुडे पार पाडतील.

दुसरे सत्र हे परीसंवादाचे राहील. प्रा.अनिल काणेकर हे अध्यक्ष असून प्रा.डॉ.प्रकाश राठोड प्रमुख वक्ते व डॉ.सवीता बेदरकर ह्या प्रमुख वक्त्या राहतील. दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन हे डॉ.संजयकुमार निंबेकर हे पार पाडतील तर प्रा.डॉ.रेवाराम खोब्रागडे हे आभार प्रदर्शन करतील.

तिसरे सत्र हे समारोपीय असून इ.झेड खोब्रागडे हे अध्यक्ष आहेत. विशेष अतीथी म्हणून डॉ.चंद्रकांत निंबार्ते , ईब्राहिम मेमन , किरण कांबळे व शिरीष निर्वाण यांची प्रमुख उपस्थीती राहील.

संविधान संस्कृतीच्या निर्मितीसाठी सर्व सुजाण नागरीकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजन समीतीमधील पदाधिकारी प्रा.डॉ.सुरेश खोब्रागडे , नरेश इलमकर , प्रा. उमेश सिंगनजुडे , सुरेंद्र बन्सोड , प्रा.डॉ.रेवाराम खोब्रागडे , नामदेव काणेकर , अश्वीनी भिवगडे , गोपाल नाकाडे , रोशन खोब्रागडे व सर्व सदस्यगण यांनी केले आहे.