आपला विदर्भगुन्हेवृत्तगोंदियाताज्या घडामोडी

“पवार ऐजन्सीज”मध्ये धाडसी चोरी प्रकरणी …. त्या मोबाईल चोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

♦️मोबाईल चोरीच्या गुन्हयातील आरोपी हे बांग्लादेशात पळुन जाण्याचा तयारीत असंताना दोघांना ग्राम- पियारपुर ता. राजमहल जि. साहेबगंज, राज्य झारखंड येथुन अटक…

♦️पोलीस ठाणे-आमगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

गोंदिया / धनराज भगत

तीन महिन्यापूर्वी दि.02 ऑक्टोबर 2023 रोजी चे रात्री च्या सुमारास फिर्यादी यांचे आमगांव येथील “पवार ऐजन्सीज” मोबाईलविक्रीचे बंद दुकानाचे पाठीमागील भिंतीला भगदाड पाडुन आत प्रवेश करुन दुकानातील विविध कंपनीचे महागडे मोबाईल फोन व मोबाईल एक्सेसरीज असा एकूण किंमती 5 लाख 59 हजार 412/- रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी चोरुन घेवुन गेले असल्याचे फिर्यादीचे तक्रारीवरुन पोलीस ठाणे आमगाव येथे अपराध क्र.331/2023 कलम 454, 457, 380, भा. दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नमुद गुन्हाच्या तपासाकामी आमगांव पोलीस ठाणे चे तपासी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे, आणि पोलीस पथक हे आरोपी शोध व तपास संबंधाने झारखंड येथे गेले असता दिनांक 09/01 /2024 रोजी चे रात्री 11 वाजता पथकाला गुप्त बातमीदार कडून माहिती मिळाली की नमूद गुन्हयातील पाहिजे आरोपी हे राधानगर पोलीस ठाणे जिल्हा साहेबगंज राज्य झारखंड हददीतील पियारपुर गावामध्ये आहेत
व ते बांगलादेशामध्ये पळून जाण्याचा तयारीत आहेत…अश्या प्राप्त खात्रीशीर माहिती वरुन आमगाव पोलीस पथक यांनी मानवी कौशल्य व तांत्रिक विश्लेषणाचा वापर करुन दि 10 जानेवारी 2024 रोजी चे रात्री 03.00 वाजता चे सुमारास स्थानिक पोलीसांच्या मदतीने आरोपीतांचे राहते घरावर छापा टाकुन गुन्ह्यांत पाहिजे आरोपी नामे- लुटू जमीदार शेख, वय 30 वर्ष. रा. अजमतटोला, प्राणपुर (पियारपुर) पोलीस ठाणे- राधानगर, जिल्हा साहेबगंज (झारखंड), व दूसरा असरुद्दीन मुस्ताक शेख वय 40 वर्ष रा. मध्य -पियारपुर भुनतीटोला, पोलीस ठाणे- राधानगर, जिल्हा साहेबगंज, (झारखंड)यांना ताब्यात घेण्यात आले. नमूद दोन्ही आरोपी यांना गुन्ह्याचे अनुषंगाने, गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमाल बाबत विचारणा केली असता मोबाईल फोन चोरी केल्याचे कबूल केले.. त्याचे ताब्यातून चोरलेल्या मोबाईल पैकी दोन मोबाईल फोन हस्तगत करून जप्त करण्यात आलेले आहेत….. गुन्ह्याचे अनुषंगाने अधिकचा सखोल तपास सुरू आहे..
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. श्री. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक गोदिया, श्री. नित्यानंद झा, अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग, आमगांव यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक युवराज हांडे, पो. ठाणे आमगांव यांचे मार्गदर्शनात सहा.पो. नि. गणपत धायगुडे, पो. हवा. लिखीराम दसरे, पो.शि. अशोक साबळे, भाऊराव कठाणे यांनी कामगिरी बजावली आहे
error: Content is protected !!