वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे
देवळी शहरात तालुका क्रीडा सकुल येथे खेळाडू आणि विंद्यार्थी यांच्या उपस्थितीत क्रीडा दिवस साजरा करण्यात आला.खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रतिमेला मालार्पणकरून अभिवादन करण्यात आले. खाशाबा जाधव यांचा (१५ जानेवारी १९२६ – १४ ऑगस्ट १९८४) हे एक भारतीय फ्रीस्टाइल कुस्तीपटू होते. हेलसिंकी येथील १९५२ मधील उन्हाळी ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे ते स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते. यावेळी क्रीडा प्रशिक्षक सुरेंद्र गांडुळे, श्याम पोटदुखे, गजानन पोटदुखे, नीलिमा तलमले, मनीषा राऊत, प्रांज्जुताई महाजन, राकेश झाडें, रितेश लोखंडे,तानाजी पंडित (प. स. देवळी ), अमोल सोनुने,धीरज पोटदुखे, यश पोटदुखे, पवन पोटदुखे, आयुष राऊत आणि विद्यार्थी आणि विद्यार्थीनी आणि नागरिक उपस्थित होते.

