सालेकसा / माइकल मेश्राम
सन २०१३ ची मंजूर कृषी उत्पन्न बाजार समिती सालेकसा स्वतंत्र बाजार पेठ तत्काळ सुरू करण्यासाठी शिवसेना तालुका सालेकसा तर्फे जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू, डॉ हिरालाल साठवणे, अर्जूनशिह बैस,तालुका प्रमुख विजय नागपुरे,शहर प्रमुख राहुल देव साठवणे यांच्या नेतृत्वाखाली रैली काढून शिवसेना सालेकसा तालुका सालेकसा च्या वतीने तहसीलदार सालेकसा यांना निवेदन देण्यात आला.
सालेकसा तालु्यातील मंजूर स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती सालेकसा येथे सुरू करण्यात यावी, गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्या पैकी एकच तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करण्यात आली नाही त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजार पेठ उपलब्ध होऊ शकली नाही म्हणून शेतकऱ्यांला शेतीमध्ये उत्पन्न होणारे धान्य, कडधान्य, भाजीपाला पिकाला योग्य भाव मिळू शकत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थकदृष्टया त्रास सहन करावा लागत आहे.
त्या कारणाने शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नावर, पिकावर परिणाम पडत आहे करिता सन २०१३ ची स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती कोणत्याही बाजार समितीला न जोडता सालेकसा या नावाने स्वतंत्र बाजार पेठ उपलब्ध करून देण्यात यावे या मागणी साठी सालेकसा तालुका सालेकसा तर्फे तहसीलदार सालेकसा यांना निवेदन देण्यात आले.
रैली मध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू, तालुका प्रमुख विजय नागपुरे, शहर प्रमुख राहुल देव साठवणे, आमगाव तालुका प्रमुख अनिल सोनकणवरे, कगेश राव, महिला जिल्हा प्रमुख मायाताई शिवणकर, आमगाव महिला तालुका प्रमुख वनिता ब्राह्मणकर, हेमराज लील्हारे, किसनलाल रहांगडाले,घनश्यंमभाऊ बहेकार , अर्जूनशिंग बैस सामाजिक कार्यकर्ता सालेकसा,संजू दरेकर आमगाव, दुर्गप्रसाद लिल्हारे,श्रीराम लिल्हारे, हिवराज येळे, पां चशीला ताई वैद्य, नरेश नागपुरे,घनश्याम नागपुरे ,गुड्डू थेर,दिनेश हटीले , शिवचरण लीलहारे, चूनीलाल बिसेन,योगराज चींधालोरे,चंदन चींधलोरे, चायेंद्र चिंधालोरे व तालुक्यातील सर्व शिवसैनिक यांनी सहकार्य केले.