आरोग्य मार्गदर्शन व मकर संक्रांति निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम
गोंदिया / धनराज भगत
सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील महिलांकरिता आरोग्य विषयक मार्गदर्शन व मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदीकुंकू चे आयोजन गोंदिया जिल्हा पोलीस सशस्त्र दूरक्षेत्र पिपरिया आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले. मान. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे साहेब गोंदिया, मान. अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या संकल्पनेतून व मान. संकेत देवड़ेकर उप विभागीय पुलिस अधिकारी देवरी, आणि मान. अरविंद जी राऊत प्रभारी पोलिस स्टेशन सालेकसा यांच्या सहकार्याने (दादालोरा खिडकी अंतर्गत) पोलीस दला विषयी महिलांमध्ये विश्वासाची व आपुलकीची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . महाराष्ट्रातील पोलिसांच्या व परिवारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या विदर्भाध्यक्ष जयश्री पुंडकर यांनी आपल्या पोलीस बांधवांचे अनेक समस्या मान. गृहमंत्री यांच्या पर्यंत पोहोचवून संघटना सतत कार्य करीत असून अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे कार्य सुरू आहेत तसेच येथे उपस्थित महिलांनी दिलेल्या आरोग्य संबंधी माहिती आत्मसात करून स्वच्छतेकडे लक्ष देऊन निरोगी कसे राहता येईल यासंबंधी मार्गदर्शन केले तसेच महिलांना होणाऱ्या संसर्गजन्य रोगाविषयी सविस्तर मार्गदर्शन याप्रसंगी डॉ.भावना खांबाळकर आरोग्य अधिकारी यांनी केले. महिलांना याप्रसंगी मार्गदर्शन करताना महिलांनी आधुनिक काळातील समस्यांना सामोरे जाण्याचे धाडस करून येतोचित मार्ग काढावा असे उद्गगार आपल्या अध्यक्षीय भाषणात पोलीस उपनिरीक्षक एकनाथ डक यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक मयुरी नागदिवे यांनी महिलांच्या हिताचे कायदेविषयक माहितीची जाणीव करून सविस्तर मार्गदर्शन केले सशस्त्र दूरक्षेत्र पिपरीया परिसरातील मोठ्या संख्येने उपस्थित महिलांना कॅम्प मध्ये कार्यक्रमात संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जयश्री पुंडकर, सचिव वंदना बैस, विनिता येवले, मधु अग्रवाल माजी सरपंच, डॉक्टर भावना खांबाळकर, सौ .विद्या डक, सौ शिवानी माळगे, यांच्या हस्ते हळदी कुंकू व भेटवस्तू चे वाटप करण्यात आले. कार्यक्रम सफलतेसाठी पोलीस उपनिरीक्षक संतोष माळगे, पोउपनि सुलाने , अमलदार, पोहवा. येसुर, खोब्रागडे, मच्छीरके, भोवते, व नापोशि बरईकर, माने, पो. शि. मळावी, कोरे, कराड, चिकने,मौजे, उके, पटले, चौधरी आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य व्हि.डी. मेश्राम यांनी केले व उपस्थिताचे आभार येसुर यांनी मानले.