भूगोल दिन – “भूगोल शास्त्र ही सर्व शास्त्राची जननी आहे” – प्रा. डॉ. संतोष डाखरे

0
58
1

न्यूजप्रभात वृत्तसेवा

भामरागड:- राजे विश्वेश्राव कला वाणिज्य महाविद्यालय भामरागड येथे भूगोल विभागा तर्फे भूगोल दिन साजरा कर-यात आला. या प्रसगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. संतोष
डाखरे राज्यशास्त्र विभाग प्रमुख तसेच प्रमुख तथिती म्हणून प्रा डॉ. भारतवाज जय पेरसापेन विज्ञान महाविद्यालय भामरागड येथिल कार्यकारी प्राचार्य तसेच प्रा. चिन्ना चालुरकर व प्रा.डॉ. प्रमोद घोनमोड उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्थावना भूगोल विभाग प्रमुख डॉ. कैलास व्हि. निखाडे यांनी दिली. त्याच्या मते महर्षि डॉ. सी. डी. देशपांडे यांचा १४ जानेवारी हा जन्मदिन राष्ट्रीय भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. या भूगोलाच्या विषयी जनसामान्यात असणारी भीती दूर व्हावी त्याचे महत्व लोकांना समजावे या उद्देशाने भारत सरकारकडून साजरा करण्यात येणारा दिवस म्हणजे राष्ट्रीय भूगोल दिन मकर संक्रातीला अर्थात 14 जानेवारीला हा दिवस साजरा करण्यात येतो सूर्याचे उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धात भ्रमण सुरु होते म्हणून भारतीय पंचागात संक्रातीला अतिशय महत्त्व आहे. प्रमुख प्राहुणे डॉ. भारतवाज यांनी विर्द्यार्थ्यांना सांगितले की भूगोल मानवी आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. प्रा. डॉ. संतोष डाखरे सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषनातून सांगितले की रोजच्या जीवनातील अनेक बाबी या भूगोलाशी संबंधित आहेत. मकर संक्रांत हा सण तर त्याचेच एक प्रातिनिधिक स्वरूप आहे. भूगोलाच्या विविध शाखा आहेत. जसे राजकीय भूगोल वस्ती भूगोल. हवामानशास्त्र आर्थिक भूगोल लष्करी भूगोल वगैर आहेत मात्र शालेय अभ्यासक्रमात फक्त राजकीय भूगोलाचाच विचार करण्यात येतो. तसेच भूगोल शास्त्र ही सर्व शास्त्राची जननी आहे असे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले. कार्यक्रमाचे सचांलन जयश्री वडडे तर आभार प्रदर्शन रोहनी पुगांटी यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थींनी व श्री. बन्डु बोन्डे यांनी सहकार्य केले.