वीस वर्षांनी सुरू झाली पुन्हा राजुरा – येरगव्हाण बस

0
17
1

ग्रामस्थांना दिलासा ; प्रवासाची अडचण दूर

कोरपना – राजूरा – गडचांदूर – येरगव्हाण बस फेरी तब्बल वीस वर्षानंतर मंगळवार दिनांक १६ पासून पुनच सुरू करण्यात आली आहे.त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची जाण्या येण्याची अडचण दूर झाली आहे.
मध्यंतरीच्या कालावधीत या मार्गावर एकही बस फेरी धावत नसल्याने परिसरातील विद्यार्थी, कर्मचारी नागरिक यांना पायदळ किंवा आपल्या खाजगी वाहनाने जाणे येणे करावे लागायचे. ही अडचण लक्षात घेता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष व धानोलीचे उपसरपंच ओम पवार राज्य परिवहन महामंडळाकडे सतत पाठपुरावा करून ही बस उपलब्ध करवून घेतली. या बस मुळे कुसळ , धानोली , तांडा , येरगव्हाण, बोरगाव, सिंगार पठार, कमलापूर , कारगाव, मरकागोंदी , पाकडी गुडा आदी आदिवासी बहुल व अतिदुर्गम भागातील गावाची मोठी गैरसोय दूर झाली आहे. नागरिकांना कोरपना , गडचांदूर, राजुरा या मोठ्या बाजारपेठ स्थानी जाणे येणे सोपे झाले आहे. बाहेर गावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कुसळ फाटा पायदळ प्रवास करत जाण्याची अडचण दूर झाली आहे. या बस चे मार्गावरील सर्व गावात स्वागत करण्यात आले. ही बस राजुरा येथून सकाळी अकरा वाजून पाच मिनिट व सायकाळी साडे वाजता या दोन वेळात सुटेल. बस सुरू करण्यात आल्याबद्दल ग्रामस्थांनी उपसरपंच ओम पवार व विभाग नियंत्रक , चंद्रपूर, आगार व्यवस्थापक राज्य परिवहन महामंडळ राजुरा यांचे आभार मानले आहे.