ठाणा / सरोज कावळे
संत जयरामदास विद्यालयात दिनांक (17 जाने.) महिला मेळावा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सी. जी. पाऊलझगडे,प्रमुख मार्गदर्शिका सौ.विद्याताई शिंगाडे तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सूरश्याम कटरे , ओमेश्वर ठाकरे, ओमकार रहांगडाले, माता पालक संघाच्या अध्यक्षा सौ. दुर्गाबाई पटले उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. मुख्य मार्गदर्शनातून सौ. विद्याताई शिंगाडे यांनी महिलांनी मुलांच्या शिक्षणात कसे योगदान द्यावे तसेच मोबाईलचा दुरुपयोग आणि जिजाऊ, सावित्री, रमाई यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. अध्यक्ष मार्गदर्शनातून सी.जी. पाऊलझगडे यांनी स्त्री शिक्षणाने व्यक्तिमत्व विकास कसा होतो यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन कु.एन. एच. थदानी यांनी करून प्रास्ताविक कु.एच.जी.रक्से तर आभार कु.एस. एस. बडोले यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कु.व्ही.एच.चाचेरे आणि मुलींनी सहकार्य केले.