ठाणा / सरोज कावळे
संत जयरामदास विद्यालय ठाणा शाळेत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अंतर्गत आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक सी.जी.पाऊलझगडे तर प्रमुख मार्गदर्शक विक्की वरखडे शाखा व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया ठाणा,प्रमुख अतिथी म्हणून जी.ए. वाढई, अक्षय भेलावे उपस्थित होते.
मुख्य मार्गदर्शनातून वरखडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरता रुजविण्याच्या दृष्टीने पैशाचे नियोजन, गुंतवणूक, बँकेचे व्यवहार, कर्ज व व्याज प्रणाली इत्यादी बाबत तसेच आर्थिक व्यवहाराकरिता UPI सारख्या आधुनिक साधनांचा वापर करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन बी. एच. राऊत तर आभार एस.एम.खेडकर यांनी मानले.