आपला विदर्भगोंदिया

स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळते :- प्रा. धर्मेंद्र तुरकर 

गोरेगाव /पंकज रहांगडाले 

सरस्वती शिशु मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय घोटी गोरेगावच्या 30 व्या वार्षिक स्नेहसंमेलन आज पार पडले. सदर स्नेहसंमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य धर्मेंद्र तुरकर या हे उपस्थित होते. यावेळी प्राचार्य धर्मेंद्र तुरकर यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधत स्नेहसंमेलन सणासारख्या कार्यक्रममुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळते त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येक शालेय उपक्रमात भाग घ्यावे असे आवाहन केले. याप्रसंगी मंचावर संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत झा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गिरधारी भाऊ बघेले,प्रा. किशोर पटले, ऍडव्होकेट वसंत चुटे, ऍडव्होकेट मनोरंजन महारवाडे, महेंद्र चौधरी, प्राचार्य बघेले मॅडम उपस्थित होते.

error: Content is protected !!