♦️ 2515 योजने अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण भूमिपूजन माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आला
प्रतिनिधी/नितेश राऊत
अर्जुनी मोर. :- तालुक्यातील सिरोली महागाव शिवाजी वार्ड 2 मधे 2515 योजने अंतर्गत सिमेंट रस्ता काँक्रीटीकरण भूमिपूजन माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आला.
राज्यातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.यासाठी लोकप्रतिनिधींकडून मुलभूत सुविधांसाठी निधीची मागणी होत असते. ही बाब विचारात घेऊन शासनाने लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा पुरवणे त्यासाठीही योजना 2515 ही योजना सुरू करण्यात आली आहे.
यावेळी गावचे सरपंच नाजूक लसूंते ,उपसरपंच सुधीर मेश्राम , ग्रामसेवक अवसरे साहेब , रमेश मस्के सर , सतिश कोसरे पोलिस पाटील , गीता मस्के माजी उपसरपंच, अनिल देशमुख, उमाकांत ढेंगे तथा ग्रा.पं.सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.