प्रतिनिधी / प्रफुल कोटांगले
चामोर्शी :- शेतकऱ्यांच्या उपजाऊ जमिनी भांडवलयांचा घशात घालण्याच्या षडयंत्राविरोधात आज दि 18 जानेवारी 2024 ला शेतकऱ्यांचा भव्य असा आसूड मोर्चा घोट क्रॉसिंग येणापूर रोड पासून ते एस.डी.ओ कार्यालय चामोर्शी पर्यंत निघाला, यावेळी शेतकऱ्यांची कोनसरी मुधोली चक नं 2, जैयरामपूर मुधोली चक नं1, तसेच सोमनपल्ली पारडी देव या गावातील 898 हे. आर जमिन हस्तातरण करण्याचा व गाव विस्थापनाचा आदेश शासनाने तातकाळ रद्द करावे, चामोर्शी तालुक्यातील शेतक-यांना नियमित व सुरळीत करावा , तसेच इतर21 गावांचा भुमि अधिग्रहणाचा फेस2 मधील भुमि अधिग्रहण रद्द करण्यात यावे, शेतक-यांशी शासनाने सार्वजनिक बैठक घेऊन जामिनिशी संदर्भात व्यवहार करावे व तसेच सभाव आंदोलन करण्याचा अधिकार नाकारणा-या जिल्हाधिकाऱ्यांची दडपशाहीवर नियंत्रण आणावे. असे न झाल्यास आम्ही परत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेऊ, जमिन आमचा हक्काची, नाही कोणाचा बापाची अश्या जोरदार नारे लाऊन शेतकर्यांनी आपले निवेदन एस.डी.ओ कार्यालय चामोर्शी येथे दिले. यावेळी रमेश कोडापे, नामदेव उसेन्डी, महेन्द्र ब्राम्हणवाडे, अमोल गण्यारपवार, नामदेव उसेन्डी, संदिप तिमाडे, निकेश गद्देवार, निलकंट निखाडे, विद्या कष्टी, अमोल सिरसागर तसेच सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते