आपला विदर्भगोंदिया

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा समारोह निमित्ताने 22 जानेवारी रोजी सार्वजानिक सुट्टी जाहीर करा

गोंदिया जिल्हा महायुती ची मागणी

गोंदिया / धनराज भगत

प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात प्रभू श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठा समारोह निमित्ताने 22 जानेवारी रोजी गोंदिया जिल्ह्यातील गावा गावांमध्ये प्राणप्रतिष्ठा समारोह साजरा होत आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय, सर्व शाळा, महाविद्यालय यांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी तसेच सार्वजनिक प्राणप्रतिष्ठा दीपोत्सवासाठी परवानगी द्यावी याकरीता गोंदिया जिल्हा महायुतीच्या शिष्टमंडळाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना श्री अमित झा, शहर अध्यक्ष भाजपा, श्री नानू मुदलियार शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, श्री मुकेश शिवहरे जिल्हाध्यक्ष शिवसेना, श्री कशिश जायस्वाल शहराध्यक्ष चांबी संघटन, कुलदीप रिणायत, नरेंद्र बेलगे सहीत अन्य उपस्थित होते.

error: Content is protected !!