शिंदे सरकारचा मोठा निर्णय : 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी

0
13
1

न्यूज प्रभात वृत्तसंस्था 

अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेकडे अवघ्या देशभरातील रामभक्तांचे डोळे लागले आहेत. येत्या सोमवारी अर्थात २२ जानेवारी रोजी हा सोहळा पार पडणार आहे. हा क्षण याचि देही याचि डोळा अनुभवण्यासाठी काही जणांनी अयोध्येकडे कूचही केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील जनतेला दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून २२ जानेवारी ला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे..

याआधीच केंद्र सरकारने देशभरात अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र सरकारने याबद्दलचा आदेश जारी केला होता. केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशात अर्धा दिवस सुट्टीचा उल्लेख आहे. कर्मचाऱ्यांच्या भावना आणि त्यांचा आग्रह लक्षात घेता केंद्र सरकारने अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे .