आपला विदर्भगोंदियाताज्या घडामोडी

प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम निमित्याने 22 जानेवारी गोंदिया शहरात विविध भक्त्तिमय कार्यक्रमाचे आयोजन

गोंदिया / धनराज भगत

22 जानेवारीला पावन नगरी अयोध्या मध्ये प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्याने गोंदिया शहरात विविध भक्त्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्राणप्रतिष्ठा निमित्याने आयोजित भक्तिमय संगीत, महाआरती, विविध कार्यक्रमामध्ये माजी आमदार श्री राजेंद्र जैन उपस्थित राहणार आहेत. यात सकाळी ७.३० वाजता श्रीराम दौड, नेहरू चौक, प्रफुल पटेल मित्र परिवार व्दारा राजीव गांधी चौक, शासकीय विश्रामगृह जवळ सकाळी ११.०० प्राणप्रतिष्ठा लाइव (LED) 🎞️📺 कार्यक्रम, दुपारी ०३.०० वाजता श्रीरामचंद्र दमाहे व् संच व्दारा रामभक्त संगीतमय कार्यक्रम, सायं ०५.०० वाजता संगीतमय श्रीरामचंद्र दरबार दर्शन, सायं ०६.०० वाजता रामयात्रा, सायं ०७.०० वाजता भव्य आतिशबाजी, रात ०८-०० प्रभू श्रीराम महाआरती व महाप्रसाद दुपारी १२.०० वाजता सिताराम मंदिर (अग्रसेन गेट) येथे आरती, ०२-०० वाजता मनॊकामना सिद्धी हनुमान मंदिर, फुलचूर येथे कार्यक्रम, ०२-३० वाजता मामा चौक येथे आरती, सायं. ०५-०० वाजता विठ्ठल रुख्मिणी मंदिर कोरणी घाट येथे महाआरती, सायं. ०७-०० वाजता हनुमान नगर, चौरागड़े शाळेजवळ येथे महाआरती, साय. ०७-४५ वाजता बस स्टॉप जवळ महाआरती, रात ०८-१५ वाजता कार्निवल उत्सव सर्कस ग्राउंड येथे महाआरती व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वरील कार्यक्रमांना जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!