आपला विदर्भगोंदियाताज्या घडामोडी

श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमीत्त सोमवारी बाह्यरुग्ण विभाग बंद राहील

 गोंदिया / धनराज भगत

महाराष्ट्र शासन राजपत्र, सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना, दिनांक 19 जानेवारी 2024 नुसार सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी ‘‘श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिन’’ निमीत्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. सदर सार्वजनिक सुट्टी लक्षात घेता, संस्थेअंतर्गत कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, गोंदिया येथील रविवार 21 जानेवारी रोजी बाह्यरुग्ण विभाग नेहमीप्रमाणे सुरु राहील. सोमवार 22 जानेवारी रोजी ‘‘श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिन’’ निमीत्त बाह्यरुग्ण विभाग पुर्णपणे बंद राहील. असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी कळविले आहे.

error: Content is protected !!