संत तुकाराम जयंती साजरी

0
18
1

सालेकसा / बाजीराव तरोने

सालेकसा येथे कुणबी सेवा समिती च्या वतीने संत तुकाराम महाराज जयंती साजरी करण्यात आली.ममताताई बहेकार यांनी फोटोला मालाअर्पण करून पूजेला सुरुवात केली. संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत – कवी होते. त्यांचा जन्म देहु या गावात २१ जनवरी १६०८ वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. तुकारामांना वारकरी ‘जगद्‌गुरू’ म्हणून ओळखतात. जगद्गुरू तुकाराम लोककवी होते. ‘जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!’ अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. अशा काळात संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले. असे कविता येटरे यांनी सांगितले कार्यक्रमावेळी कुणबी सेवा समिती चे सचिव महेश बागडे, बबलू शिवणकर, श्याम येटरे, सचिन बहेकार, रवी चुटे, दिशांत फुंडे, अशोक खोटेले, सुरेश मेंढे, हर्ष खोटेले, काशीराम पाथोडे व बहेकार कॉम्प्लेक्स चे सर्व व्यापारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन निलेश बोहरे आणि आभार कुणबी महिला अध्यक्ष निशा बागडे यांनी केले.