फसवणूक : बापरे…😱 एकच प्लाट दोन वेळा विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

0
48
गोंदिया / धनराज भगत

घटना असी की, दि. ०७/०१/२००९  ते दि. १२/०२/२०२२ दरम्यान यातील आरोपीने मौजा आमगाव येथील बेदाडी रोडवर, कालव्याच्या बाजुला, बागेश्वर ले – आउट ला लागून असलेला, त. सा.क्र १४ येथील गट क्र ६४६ व गट क्र. ६४७ मधील प्लाट फिर्यादी सह इतर लोकांना एकच प्लॉट दोन वेळा बेकायदेशीरपणे, खोटी कागदपत्रे तयार विक्री करून फिर्यादिची फसवणुक केली आहे.

त्याचप्रमाणे मंजूर लेआऊट मधील मोकळी जागा सुध्दा फसवणुक करण्याच्या उद्देशाने आरोपी उमेदलाल जैतवार,(५२) ने विक्री केल्याने फिर्यादी ओंकारप्रसाद नथुलाल टेंभरे, वय ७० वर्ष कामठा चौक, ता. गोंदिया यांचे तोंडी रिपोर्टवरून पोस्टे आमगाव येथे अप क. २५ /२०२४ कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.  सदर गुन्हयाचा तपास सपोनि धायगुडे पो.स्टे. आमगाव, हे करीत आहेत.

Previous articleसंत तुकाराम जयंती साजरी
Next articleआ.विजय रहांगडाले यांच्या हस्ते दवणीवाडा मंडळात ९२.५० लक्ष रुपये विकासकामांचे भूमिपूजन