आपला विदर्भवर्धा

देवळी शहरात श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सव साजरा , देवळीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद , विविधतेतून एकतेचे दर्शन…

 

वर्धा जिल्हा प्रतिनिधी:- गजानन पोटदुखे

दिनाक:-23 जानेवारी 2024

देवळी शहरात श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सव मोठ्या धुमधडाक्यात , आणि उत्साहात साजरा करण्यात आला . महोत्सवात विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी, नागरिकांनी, महिलांनी आणि युवा वर्गांनी सहभाग घेत महोत्सव पार पडला. सकाळच्या प्रहरी शेकडो महिलांनी कलश यात्रा काढण्यात आली . मोठ्या प्रमाणात भजन मंडळी सहभाग घेतला, विविध वेशभूषणे लहान घालूनमुला मुलीची यांची झाकी तयार करण्यात आली . काही शाळेमध्ये सुद्धा लहान मुलांना राम आणि सीतेच्या वेशात सजविण्यात आले. सर्वत्र राममय वातावरण पहावयास मिळाले. देवळी येथील श्रीराम मंदिरात सकाळपासूनच विविध महोत्सव पूजा आरती, भजन सुरू होते. श्रीरामाची कलाकृती रांगोळीच्या स्वरूपाने काढण्यात आली. विविधतेतून एकतेचा संदेश देत विविध जाती धर्माचे लोक या महोत्सवात सहभागी झाले. सायंकाळी बराच वेळ झाला तरी भक्ताची राम मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी जमा झालेली होती. सायंकाळी राम मंदिरात अकरा हजार दिवे प्रज्वलित करून श्रीरामाला अभिवादन करण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ठिकठिकाणी भक्तांच्या सेवेसाठी नागरिकांनी लंगर चे स्टॉल लावित सेवा प्रदान केली. सायंकाळचे वेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी श्रीराम मंदिरत हनुमान चालीसा पठण करीत उत्सवाची सांगता केली. देवळी शहरात आणि ग्रामीण भागात जणू काही दिवाळीत असल्याचे भासत होते. पाचशे वर्षाचा कार्यकाळ नंतर श्रीरामाचे स्थायी प्राण प्रतिष्ठा झाल्याचा आनंद भक्ताच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

error: Content is protected !!