आपला विदर्भगोंदिया

सकल समाज तर्फे कारसेवकांचा सत्कार

आमगांव:अयोध्या येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा समारोह निमित्त आमगांव तालुक्यातुन 1990 व 1992 ला अयोध्याला कारसेवकांनी सहभाग दिला त्यांचा सत्कार कार्यक्रम सकल समाज तर्फे गायत्री मंदिरच्या सभागृहात घेण्यात आले.
सदर कारसेवकांचा सत्कार चिकित्सक डॉ. अरुण जायस्वाल , सकल समाजाचे प्रतिनिधि रमेश अग्रवाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भंडारा विभाग प्रचारक सुजीत कुंभारकर, गीतगंगा परिवारचे सुनिल असाटी यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
या वेळी कारसेवकांनी आपले अनुभव कथन केले.त्यात प्रामुख्याने माजी भाजपा जिल्हा अध्यक्ष केशवराव मानकर व सेवा निवृत्त प्राचार्य हेमराज फुंडे, हरिराम करंडे, सुनील पडोळे, नगर कार्यवाह दिनेश शेंडे यांनी आपले अनुभव सांगितले.
कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथिनी आपल्या उदबोधनातून कारसेवकांचे गौरवगान करून त्यांची प्रशंसा केली.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कारसेवकांचा परिवारातील महिला पुरुष बालगोपाल,जेष्ठ नागरिक व सकल समाजचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्तावना,संचालन व आभार उमेश मेंढे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्या करिता सर्व सकल समाज व गीतगंगा परिवार यांनी परिश्रम केले.

error: Content is protected !!