के.के. इंग्रजी प्रायमरी शाळा आमगाव येथे वार्षिक स्नेहसम्मेलन मोठ्या थाटात साजरा

0
68

गोंदिया / धनराज भगत

दिनांक 18/1/2024 व 19 /1/ 2024 रोज गुरुवार व शुक्रवार ला संस्थेचे संचालक श्री केशवराव जी मानकर यांच्या उपस्थितीत स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहिल्या दिवशी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन बीडीओ श्रीमती अर्चना अयाचित यांच्या हस्ते करण्यात आले तसेच दुसऱ्या दिवशीचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक श्री युवराज हांडे यांच्या हस्ते करण्यात आले. दोन्ही दिवशीच्या कार्यक्रमात संस्थेचे संचालक श्री केशवराव जी मानकर, अध्यक्ष सुरेश बाबूजी असाटी, उपाध्यक्ष प्रमोद जी कटकवार तसेच संस्थेचे सदस्य श्रीमती स्नेहा मानकर ,श्री ललित मानकर, श्री हरिहर भाऊ मानकर, उर्मिला ताई कावडे, लक्ष्मीताई नागपुरे तसेच प्राचार्या श्रीमती रीना भुते,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,पालक व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. दोन्ही दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात भाग घेतले आणि भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडवीत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. पालकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवून कार्यक्रमात सहभागी झाले व वार्षिक संमेलन संपन्न करण्यात सहकार्य केले. आणि सरते शेवटी वंदे मातरम् गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous articleराष्ट्रीय मतदार दिनाचे 25 जानेवारी रोजी आयोजन
Next article😱ब्रेकिंग😱 : दरेकसा घाटी मे पलटा गिट्टी भरा टिप्पर ; दो लोग जख्मी