खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळाव्याचे २७ जानेवारी रोज शनिवारला सायंकाळी ५.०० वाजता एन. एम. डी. महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्ता मेळाव्याला माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळाव्याला जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केले आहे.