आपला विदर्भगोंदियाताज्या घडामोडीनोकरी-विषयक

भसबोडन ची सुषमा झाली एअर होस्टेस

 

🚩आदिवासी डोंगराळ मागासलेल्या गावातील आदिवासी मुलीवर कौतुकाचा वर्षाव.

गोंदिया / न्यूज प्रभात वृत्तसेवा

गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम नक्षलग्रस्त अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सुषमा शिवलाल कोरेटी हिने मुंबई एअर इंडिया ची परीक्षा प्रथम क्रमांकात पास होऊन एअर होस्टेस म्हणून तिची निवड झाली आहे तिच्या निवडीबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे. तालुक्यातील 15 घरांची वस्ती असलेल्या भसबोडन (चुटिया) या गावातील रहिवासी असलेल्या सुषमा ही तालुक्यातील नवे जिल्ह्यातील आदिवासी समाजातील पहिली एअर होस्टेस ठरलीआहे. जिद्द ,चिकाटी, अभ्यासातील सातत्य व ध्येय प्राप्त करण्याची महत्त्वकांक्षा यामुळे तिने हे यश संपादन केले.
शिवलाल कोरेटी हे एक सामान्य शेतकरी, आई एक सामान्य गृहिणी. त्यांना तीन मुलीं व एक मुलगा. सुषमा बहिणीमध्ये धाकटी असून तिचे प्राथमिक शिक्षण वर्ग १ ते ४ चे शिक्षण अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अतिशय दुर्गम डोंगराळ व मागासलेले जेमतेम दहा ते १५ कुटुंब संख्या असलेले वस्तीत जिल्हा परिषदेची वस्ती शाळेत झाले.

अतिशय दुर्गम डोंगराळ व मागासलेले भागातील भसबोडन या लहानशा गावात वर्ग एक ते चार चे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षण जवळच पायवाटेने चालत चालत झाशी नगर या लहानशा अतिशय दुर्गम डोंगराळ व मागासलेल्या गावात वर्ग ५ ते ७ चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर वर्ग ८ ते १० हायस्कूलचे शिक्षण आदिवासी विकास विद्यालय झाशीनगर येथे पूर्ण केले.
पुढे वर्ग ११ व १२ चे शिक्षण सोसायटी सायन्स कॉलेज साकोली येथे पूर्ण केले.तिथे सुषमाने प्राविण्य प्राप्त करून ,पुढील शिक्षण नागपूर शहरांमध्ये घेतले. आज लहानशा अतिशय दुर्गम डोंगराळ मागासलेल्या भागातील एका सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी, आदिवासी कुटुंबातील सुषमा हिने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण प्रशिक्षण याकरिता मार्गदर्शन मिळवून व पाहिजे त्या ठिकाणी प्रवेश मिळवून एअर होस्टेस चे प्रशिक्षण पूर्ण केले.
तिच्या वर्ग एक ते वर्ग दहा पर्यंतच्या शिक्षणात त्या ठिकाणी शिकविणारे मुख्याध्यापक गोस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले.
तर वर्ग ८ ते १० पर्यंत झाशी नगर येथील आदिवासी विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. टी. नाकाडे, व्ही. बी .राणे, आर.पी.बोरकर, वाय.डब्ल्यू. लोंढे ,एस.एम.लंजे , पुल्लूके यांचे मार्गदर्शनाचे लाभ तिला मिळाले. गुरुजनांचे मार्गदर्शन आणि सुषमाच्या जिद्दीने अखेर सुषमाने यश गाठले ते गाठलेच.ती उच्च शिक्षण घेऊन नागपूर मध्ये गेली आणि नागपुरातून एअर होस्टेचे प्रशिक्षण घेतले.
गुणानुक्रमे प्रथम येत मुंबई एअर इंडिया मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन ती आज एअर होस्टेस झालेली आहे.
“प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे ” ही म्हण तिने सार्थक करून दाखवली. तिच्या महत्त्वकांक्षेने तिने आकाशाला गवसणी घातलेली आहे. या तिच्या यशाचे कौतुक भसबोडन,झाशीनगर, धाबे पवनी या परिसरात आदिवासी समाजातील एका तरुणीने आदिवासीव ग्रामीण समाजातील युवक-युवती पुढे एक प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे. तिचे अभिनंदन सर्व स्तरातील नागरिक उत्साहाने करत आहे.
सुषमाचे गुणानुक्रमे पहिली येणे व एअर होस्टेस म्हणून निवड होणे याचा आनंद पूर्ण गावांमध्ये साजरा केला जात आहे.आज भसबोडन हे तसे दुर्लक्षित असलेले गाव आज संपूर्ण जिल्ह्यात प्रकाश झोतात आले आहे. याचे श्रेय सुषमाला जात आहे. एका लहानशा गावात कुठल्याही प्रकारांच्या कोचिंग क्लासेस नाही. कुठल्याही प्रकारच्या ट्युशन न घेता आज या आदिवासी बहुल क्षेत्रातील एका साधारण मोलमजुरी व कष्ट करून शेती करणाऱ्या कुटुंबातील सूषमा ने स्वतःचे आई-वडिलांची व आपल्या जन्म गावाचे नाव लौकिक केले आहे. ती खरोखरच कौतुकास पात्र आहे व जे सुरुवातीपासूनच ट्युशन क्लासेस कोचिंग क्लासेस लावून पुढे शिक्षण घेतात व त्यांच्या इच्छेनुसार हवे ते यश संपादन होत नाही. म्हणून कुठलेही प्रकारच्या ट्युशन कोचिंग न लावता ही आपण ध्येय ठरवलं तर नक्कीच धेय्य गाठून आकाशाला गवसनी घालता येऊ शकत, यश संपादन करता येऊ शकते,असे आज सुषमाने महत्त्वकांक्षा जिद्द व चिकाटी यावर सर्वांना दाखवून दिले आहे. खरोखरच सुषमा तू कौतुकास पात्र आहेस.

नागपूर मध्ये शिक्षण घेत असतानाच एअर होस्टेस करिता विविध सेमिनार आयोजित करण्यात आले त्या सेमिनार ला मी नियमित जात होते. याचाच फायदा मला पूढे झाला आणि आज मला एअर इंडियात एअर होस्टेस म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.

-कु.सुषमा कोरेटी,मुंबई एअर इंडियात एअर होस्टेस.

error: Content is protected !!