0
50

पालकमंत्री महोदयांनी शासन स्तरावर प्रयत्न करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

       अनिल पाटील म्हणाले, लोकांची कामे कशी होतील याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्याकडे कामासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकांचा सन्मान करुन लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा.

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलतांना सविता कोडापे म्हणाल्या, पं.स.अर्जुनी मोरगाव च्या इमारतीमधून नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करावा. या तालुक्यातील शिक्षण विभागातील शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे ती पदे भरण्यात यावी व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग प्रशस्त करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट विकास अधिकारी अर्जुनी मोरगाव विलास निमजे यांनी केले. कार्यक्रमास जि.प.सदस्य जयश्री देशमुख, सरपंच खोडशिवनी गंगाधर परशुरामकर, माजी जि.प.अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, केवळराम पुस्तोडे, लायकराम भेंडारकर, पोर्णिमा ढेंगे, कविता घाटबांधे, नाजुक कुमरे, नुतन सोनवाने, दानेश साखरे यांच्यासह अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार विस्तार अधिकारी पं.स.अर्जुनी मोरगाव अनिल चव्हाण यांनी मानले.

Previous articleभसबोडन ची सुषमा झाली एअर होस्टेस
Next articleनागरिकांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम