गोंदिया / धनराज भगत
आमगाव येथील विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताकदिनी (ता.२६)ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला.ध्वजारोहण संस्थेचे कोषाध्यक्ष नरेशकुमार माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी संस्थासचिव बबनसिंह ठाकूर होते.प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य अनिल मुरकुटे,महाविद्यालयाचे प्राचार्य डी.एस. टेंभुर्णे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतीय संविधानाचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पित करून करण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन प्रा.प्रकाश कटरे यांनी केले व आभार प्रा.प्रविण मानापूरे यांनी मानले.कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

