गोंदिया/ धनराज भगत
आमगाव नगर समिती व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने येथील डाॅ.आंबेडकर चौकात प्रजासत्ताक दिनी (ता.२६)भारतीय संविधानाचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला.ध्वजारोहण प्रतिष्ठित नागरिक बबनसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष राजभूषण मेश्राम होते.प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ.विद्यालाल राहांगडाले, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका पुष्पलता तिवारी,मंगल गोंडाणे, पिंकेश शेंडे,माजी प्राचार्य भाऊ वासनिक, शिवचरण शिंगाडे गुरूजी,माजी गटशिक्षणाधिकारी वाय.सी.भोयर उपस्थित होते.तसेच नगर समितीचे सदस्य, स्मारक समितीचे सदस्य, नगरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन रविंद्र मेश्राम यांनी केले व आभार प्राचार्य डी.एस. टेंभुर्णे यांनी मानले.

