जिल्हा परिषद शाळा बोदा येथे तीन दिवसीय स्नेहसंमेलन 

0
95

प्रतिनिधि दीपक चौरागडे

 ग्रामपंचायत बोदा व शाळा व्यवस्थापण समिती व गावकरी ,पालक व विद्यार्थी तथा शिक्षक यांच्यासंयुक्त विद्यमाने बोदा तीन दिवसीय स्नेहसंमेलन पार पडले. यंदाच्या त्रिदिवशीय संम्मेलनातील विद्यार्थ्यांच्या रंगमंचावरील कला गुणांना पाहुन बोदा च्या गावकर्‍यांनी “आदर्श शाळा”” बनवन्याचा विडा उचलला.परिहार सर मुख्याध्यापक , बिसेन सर, चव्हाण मँडम,दमाहे मॅडम व विनोद सर यांच्या उत्तम नियोजनामुळे गावात शाळेबद्दल चे सकारात्मक दृष्टीकोण दिसुन येत आहे. पहिल्या दिवशी सेवानिवृत्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा तसेच दुसर्‍या दिवशी मतदाता दिवस व महिला सबलीकरणा अंतर्गत SDO मॅडम पुजा गायकवाड व अॅडव्होकेट मॅडम हेमलता पतेहे यांनी केलेल्या मार्गदर्शनाने स्त्री शिक्षणाचे महत्व व तिसर्‍या दिवशी बक्षिस वितरण अशी उत्तम घडी बसवुन सुनिल नागदेवे सरपंच, बेनिराम बारेवार अध्यक्ष शा व्य स व पालक यांच्या सहकार्याने सांस्कृतिक कार्यक्रम दि 24,25, व 26 जानेवारी या कालावधीत उत्तमरित्या पार पाडण्यात आला.विनोद सरांच्या कौशल्यपुर्ण संचलनाने लोकं त्यांची खुप प्रशंसा करु लागले .

https://youtu.be/LuaVf4HwstM?si=V8GHCZDaBcKL0PGU

 

Previous articleडाॅ.आंबेडकर चौकात ध्वजारोहण
Next articleदेवळी शहरात गावगुंडाचा वाढता हौदोस, सामान्य नागरिकांची वाढती डोकेदुखी……..