वर्धा जिल्हा प्रतिनिधी : – गजानन पोटदुखे
देवळी शहरात बस स्टॅन्ड चौक आणि सार्वजनिक ठिकाणी देवळीतील मद्यपी युवकाचा दुकानदारांना , नागरिकांना त्रास देणे सुरु केले आहे. अशातच काल 26 जानेवारी निमित्त नगरपरिषद शाळा येथे काही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमात मद्यपी युवकाणे जाऊन धिंगाणा घातला. ग्राउंडच्या परिसरात एकमेकांना गोटमार सुरू केली. ग्राउंडच्या परिसरात लहान मुले खेळत होती . त्यांच्यामध्ये धावपळ सुरू झाली. सुदैवाने कोणालाही मार लागलेला नाही. तेथील शिक्षकांनी त्यांना आवाराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यातील एका युवकांनी राहुल नावच्या युवकाच्या गालावर धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. त्यानंतर तिथील चौकीदाराने तत्काळ पोलिसांना बोलावून घेतले. मोठा अनर्थ टळला. काही आरोपींना अटक करण्यात आली.विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये भीतीचे पसरलेले होते. या घटनेमुळे नियोजित कार्यक्रम शिक्षकांनी रद्द केले. काही युवक रात्रीच्या वेळेला मध्य प्राशन करून जबरदस्तीने दुकानदारांना धमकवीत ,दादागिरी,शिवीगाळ करीत दुकान बंद करतात. तरी अशा गावगुंडाचा त्वरित बंदोबस्त करावा अशा प्रकारची ओरड नागरिकांमध्ये होत आहे . तरी देवळी पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गावगुंडाचा ताबडतोब बंदोबस्त करणे आवश्यक झाले आहे.
https://youtu.be/LuaVf4HwstM?si=V8GHCZDaBcKL0PGU

