गोंदिया धनराज भगत
26 जाने.प्रजासत्ताक दिनी गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील केशोरी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अमलदारांनी माननीय निखिलजी पिंगळे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2023 साली पोलीस स्टेशन हद्दीतील महिला, पुरुष व युवक- युवती सह विद्यार्थ्यांसाठी अनेक मार्गदर्शन शिबिरे, वाचनालय आणि आरोग्य शिबिरासह गरजवंतांना वेळोवेळी मदत करून संकटात सापडलेल्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्या पर्यंतचे कार्य करीत लोकोपयोगी उपक्रम राबवून सतत समाजात जन-जागृती करीत आपल्या पोलिस विभागाची प्रतिमा उज्वल राहावी यासाठी करीत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन माननीय नामदार धर्मराव बाबा आत्राम पालकमंत्री गोंदिया जिल्हा यांच्या हस्ते माननीय पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या उपस्थितीत केशोरी पो.स्टे.चे ठाणेदार मान. सोमनाथजी कदम , पो. उपनि. प्रतापजी बाजड , पोहवा. सुनील रामटेके,पोहवा पुनम हरिणखेडे , पो . नाईक राहुल चिचामलकर प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2024 रोजी सम्मान -पत्र देऊन सर्वांना सन्मानित करण्यात आले.
आपल्या कार्याचे गौरव करून आपणास सन्मानित केल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस बाई संघटनेच्या विदर्भाध्यक्ष जयश्री पुंडकर यांनी आपण सर्वांचें अभिनंदन करून पुढच्या वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या आणि असेच समाज हिताचे कार्य सतत घडत राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली.