आपला विदर्भवर्धा

धक्कादायक…देवळी येथील अथर्व भोजनालयात दारु साठा जप्त

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे

दिनांक :- 29 जानेवारी 2024

पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार 27जानेवारी ला शनिवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान वर्धा यवतमाळ रोडवरील अथर्व भोजनालय देवळी येथे धाड टाकून दारुचा माल जप्त करण्यात आला. नेहमी सायंकाळच्या वेळेला या हॉटेलमध्ये सारखी गर्दी पहावयास मिळत होती . संशयाच्या आधारावर आणि सभोवतालच्या नागरिकांच्या तक्रारीवरून देवळी पोलिसांनी धाड टाकली असता काही इसम तिथे टेबलवर काही शिषा ठेवून बिनधास्तपणे दारू पीत असल्याचे आढळून आले . सदर भोजनालय चालक तिथे त्यांना सेवा पूरवित असल्याचे प्रथमदर्शी निदर्शनात आले यावरून आरोपी भोजनालय चालक जगन रामकृष्ण वैद्य वय (45)रा.देवळी,अन्य तीन मद्यपी यांच्या विरोधात देवळी पोलीस स्टेशन येथे अप. क्र.84/2024 कलम 65आहे,77A68 मदका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर हॉटेल चालकाचा मुलगा कोणत्यातरी डिजिटल मीडियाचा संपादक म्हणून काम करतो , आणि वर्धा पोलीस दलात गृह रक्षक असल्याचे कळते . कायद्याचे रक्षक असलेल्या गृह रक्षकाच्या घरीच अवैध व्यवसायचालू असल्याने चर्चेस उधान आले आहे. बरेच दिवसापासून येथे सायंकाळी गर्दी पहावयास मिळत आहे अशी नागरिकांची प्रतिक्रिया आहे . पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे.

error: Content is protected !!