गोंदिया / धनराज भगत
आमगाव स्थानिक भवभूती शिक्षण संस्था द्वारा संचालित श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे दोन दिवसीय मैदानी खेळाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन अभ्यासासोबतच त्यांच्या सार्वत्रिक व मानसिक विकासासाठी मैदानी खेळाची गरज आहे या दृष्टिकोनातून दरवर्षी महाविद्यालयात मैदानी खेळाचे आयोजन करण्यात येते.
सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. तुलसीदास निंबेकर व महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते. आयोजक म्हणून प्रा. जितेंद्र शिवणकर, प्रा. चेतन बोरकर, प्रा. देवेंद्र बोरकर, प्रा. परमेश्वर वानखेडे, महेंद्र तिवारी, ऋतू कोरे, रोशनी अग्रवाल, मनीषा बिसेन,राणी भगत, रचना पांडे, दीक्षा खोब्रागडे व विद्यार्थी प्रमुख रितिक जैतवार, खुशी मुनेश्वर, श्रीधर भांडेकर, जिया कावळे यांनी परिश्रम घेतले.