न्यूजप्रभात वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “परिक्षा पे चर्चा” या विषयी वर्ग दहावी / बारावी च्या विद्यार्थ्यांना “तनाव मुक्त” व “भय मुक्त” परिक्षा देता यावे यासाठी विद्यार्थ्यांना ‘परीक्षा पे चर्चा’ च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना आनलाईन मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शन मिळावा यासाठी आदर्श विद्यालय येथे प्रोजेक्टरच्या माध्यमातून मोदी यांचे आनलाईन मार्गदर्शन दाखवण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी भवभूति शिक्षण संस्थेेेचे संचालक व मनोनीत जी.प. सदस्य हरिहर मानकर,आदर्श विद्यालयाचे प्राचार्य डि. एम. राऊत, उपप्राचार्य के. एस. डोये, पर्यवेक्षक डि. बी. मेश्राम पंचायत समिती शिक्षण विभागातील गटसमनवयक बोपचे सर व चमू शिक्षक उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना भयमुक्त मार्गदर्शन करुन सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या.

