आपला विदर्भगोंदियाताज्या घडामोडी

रहांगडाले आणि पटले सम्राट विक्रमादित्य राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होणार

तुमसर / सतीश पटले

अखिल भारतीय क्षत्रिय पोवार (पंवार) महासंघाच्या वतिने स्व.लाखनलालजी बिसेन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा यावर्षीचा चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य राष्ट्रीय पुरस्कार शिक्षण महर्षी तथा पटसम्राट जगतराम सोनुजी रहांगडाले मोखे(किन्ही),साकोली यांना तथा स्व.मुन्नीलालजी पटले तात्कालिन अध्यक्ष पंवार राम मंदिर सिंहद्वार बैहर, लिंगा (परसवाडा)बालाघाट यांना संयुक्तपणे घोषित करण्यात आलेला आहे.
अखिल भारतीय क्षत्रिय पोवार (पंवार ) महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन श्री.गौरीशंकर लाॅन भंडारारोड तुमसर येथे शनिवार ता.3 फेब्रूवारी रोजी आयोजित करण्यात आलेले आहे.
या राष्ट्रीय अधिवेशनात देश स्तरावरील 36 कुल पोवार (पंवार)समाजाच्या बंधुभगिनीना आमंत्रित करण्यात आलेले आहे.
चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य राष्ट्रीय पुरस्काराच्या मानकऱ्यांना हा पुरस्कार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ.विशाल बिसेन यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.
राष्ट्रीय अधिवेशनात पोवार( पंवार )समाज बांधवाना बहुसंख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन महासंघाचे राष्ट्रीय महासचिव से.नि.प्राचार्य खुशाल कटरे यांनी केले आहे.

error: Content is protected !!