आपला विदर्भआयुर्वेद / आरोग्यगोंदियाताज्या घडामोडी

कुष्ठमुक्त भारताचा संकल्प घ्या — डॉ अंबरीश मोहबे

गोंदिया / धनराज भगत

आज दिनांक ३० जाने.२०२४  रोजी “राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन अभियान” अंतर्गत स्थानिक केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात स्पर्श अभियायनाचे उदघाटन करण्यात आले.
प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबरीश मोहबे यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पित केली दोन मिनिटे मौन पाळून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबरीश मोहबे यांच्या के टी एस च्या सर्व स्टाफ ने महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पित केली.
या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबरीश मोहबे यांनी उपस्थित स्टाफ यांना स्पर्श अभियान अंतर्गत कुष्ठमुक्त भारत ची शपथ
दिली . आणि आवाहन केले की स्पर्श अभियानाला सहकार्य करा. कुष्ठरोग औषोंधोपचार केल्याने बरा होतो .आपल्याला महात्मा गांधी यांचे कुष्ठमुक्त भारताचे स्वप्न साकार करायचे आहे.
या वेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ जैस्वाल, डॉ सुवर्णा हुबेकर ,डी पी एम वानखेडे, डॉ मीना वट्टी ,समीक्षा चिकलकर तसेच सपना खंडाईत सारिका कांबळे डॉ उपाध्याय , प्रशांत निशांत बन्सोड, ब्राह्मणकर, बघेले आदी उपस्थित होते.कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!