ईव्हीएम हटाव,संविधान बचाव च्या मागणीसाठी महिलांचे साकडे…

0
89
1

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे

दिनांक :- 30 जानेवारी 2024

देवळी: देवळी तहसील कार्यालयात ईव्हीएम हटाव, संविधान बचाव च्या मागणीसाठी देवळीतील महिलांनी प्रभारी तहसीलदार दत्ता जाधव व पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांचे मार्फत मुख्य निवडणूक अधिकारी तसेच निवडणूक आयोगाला निवेदन देऊन साकडे घातले.यावेळी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा- देवळीच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून काही मुद्यांना चालना दिली. यात समाजातील दलिर, शोषित, पीडित, अल्पसंख्याक ओबीसी तसेच इतर प्रवर्गाच्या उत्थानासाठी संविधानाने अधिकारी दिले आहे.परंतु काहींनी सोयीचे राजकारण करण्यासाठी या सविंधानालाच नख लावण्याचा प्रयत्न चालविला आहे.शिवाय मतदानादरम्यान ईव्हीएम मशीनच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने लोकतंत्र धोक्यात आले आहे. अश्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. शिवाय सविंधान सन्मान हेच देशाचे नागरिकत्व तसेच ईव्हीएम हटाव, देश बचाव च्या घोषणा देवून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी माधुरी भगत, सुनीता ढोरे, सुनीता कांबळे, चंदा डंभारे, मनीषा लोखंडे, भ्याग्यश्री मैह्यस्कर, सविता गंभीर, रत्नमाला वाघमारे, सुजाता पाटील तसेच बौद्धबांधवांची उपस्थिती होती.