शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा -प्रकल्प अधिकारी, विकास राचेलवार यांचे आव्हान

0
68

♦️ शहरी भागातील लोकांनाही मिळेल शबरी घरकुल योजनेचा लाभ

गोंदिया / धनराज भगत

एकात्मिक आदिवासी विकास,प्रकल्प देवरी अंतर्गत महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग ,शासन निर्णयान्वंये शबरी आदिवासी घरकुल योजना सन 2023-24 या वित्तीय वर्षात ग्रामिण क्षेत्राकरीता एकुण 1500 चे उदिष्टे प्राप्त झाले होते. आदिवासी लाभार्थ्याचे अर्जाचे प्रस्ताव जास्त प्रमाणात कार्यालयात प्राप्त झाले असल्याने मा.प्रकल्प अधिकारी यांनी शासनाला सन – 2023-24 करीता वाढीव 500 उदिष्टांची मागणी पाठपुरावा करून शासन स्तरावर केलेली आहे. यापुर्वी शबरी घरकुल योजनेचा लाभ ग्रामिण भागातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यानाच मिळत हेाता.
आता महाराष्ट्र शासनाने आदिवासी विकास विभाग,शासन निर्णय दिनांक 11 जानेवारी 2024 अन्वंये नगरपरिषद /नगरपंचायत (शहरी क्षेत्र) मध्ये कुडामातीच्या,झोपडया कच्चे घरात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी कुंटूबांना शबरी घरकुल योजनेचा लाभ देण्याचे घोषित कले आहे.यामुळे शहरी भागातील अनुसूचित जमाती|च्या लाभार्थ्याना सुध्दा सन-2023-24 पासुन या योजनेचा लाभ मिळणार आहे.श्री.विकास राचेलवार,प्रकल्प अधिकारी ,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,देवरी यांनी लाभार्थ्याचे प्रस्ताव प्रकल्प कार्यालय,देवरी तसेच गृहपाल ,आदिवासी मुंलाचे शासकिय वसतीगृह,गोंदिया क्र.1 व 2 तसेच गृहपाल ,आदिवासी मुलांचे वसतीगृह,तिरोडा,सडक-अर्जूनी/मोर-अर्जुन/आमगाव/सालेकसा/या ठिकाणी शबरी घरकुल योजनेचा (शहरी विभाग ) अर्ज प्राप्त करून घेण्याचे आव्हान केले आहे.
Previous articleईव्हीएम हटाव,संविधान बचाव च्या मागणीसाठी महिलांचे साकडे…
Next articleधक्कादायक : दारू पकडल्याची बातमी प्रकाशित केली म्हणून पत्रकारास जीवाने मारण्याची धमकी …….